मानबिंदूला दणका
नागपूर
- मानबिंदूने मजिठिया आयोगाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही.उलट नागपूर
आवृत्तीतील ६१ कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. पैकी २४ कर्मचारी कायम (
पर्मनंट ) होते. या २४ कर्मचाऱ्यांनी नागपूरच्या इंडस्ट्रियल कोर्टात धाव
घेतली होती. कोर्टाने या सर्व कमर्चाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्याचा आदेश
मानबिंदूच्या चेअरमनला दिला आहे. कामावर नाही घेतल्यास ७५ टक्के वेतन
घरबसल्या दयावे असा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे मानबिंदूला चांगलाच दणका
बसला आहे.
मानधन न मिळाल्याने स्ट्रिंजर रिपोर्टर अस्वस्थ
मुंबई
- पुढारीच्या ठाणे आवृत्तीच्या नवीन स्ट्रिंजर रिपोर्टरचे गेल्या आठ
महिन्यापासून तर जुन्या रिपोर्टरचे तीन महिन्यापासून मानधन न मिळाल्याने
सर्व रिपोर्टर अस्वस्थ आहेत,मानधनाची विचारणा केली असता, नेहमी उडवाउडवीची
उत्तरे मिळत आहेत.
पुढारीची
ठाणे आवृत्ती सुरू होवून आठ वर्षे सुरू झाली, पण म्हणावा तितका खप नाही,
मॅनेजमेंटकडून स्ट्रिंजर रिपोर्टरना जाहिरातीसाठी नेहमी दबाव टाकला जातो,
पण मानधन देण्याच्या नावाखाली बोंबाबॉंब सुरू आहे. वेळवर मानधन मिळत
नसल्याने रिपोर्टर पाट्या टाकण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे अंकाचा दर्जा
दिवसेंदिवस घसरत चालला आहे.