नागपूर -
महाराष्ट्रात नंबर १ चा दावा करणाऱ्या लोकमतची १५ डिसेंबर पासून दिल्ली
आवृत्ती सुरु होणार आहे. महाराष्ट्राचा आवाज आता दिल्लीतही घुमणार !अशी
जाहिरातबाजी लोकमतने महाराष्ट्रात सुरु केली आहे. संपादक म्हणून सुरेश
भटेवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण पाने १६ राहणार असून, पैकी १२
पाने महाराष्ट्रात तयार होणार आहेत. पैकी ६ पाने औरंगाबाद आणि ६ पाने
नागपुरात लागणार आहेत.
दिल्लीत मराठी भाषिकांची संख्या जवळपास ४ लाख असल्याचा सर्व्हे लोकमतने केला आहे.ऍडव्हान्स
बुकिंग जवळपास २५ हजार करण्यात आली आहे. महाराष्ट्र मित्र मंडळ आणि
महाराष्ट्रातील इतर संघटनाची मदत घेण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्लीत छाप मारण्यासाठी आणि कॉर्पोरेट
क्षेत्राला आमची दिल्ली आवृत्तीही आहे हे सांगण्यासाठी लोकमतचे ही रिस्क घेतली आहे. आता ती कितपत यशस्वी होते, हे एक कोडेच आहे.