मुंबई -
ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराथी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये निवासी
संपादकपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे दैनिकात अमुलाग्र बदल
होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उन्मेष
गुजराथी सन २००० पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. एशियन इजमधून श्रीगणेशा
केल्यानंतर त्यांनी डे व्ह्यू, द फ्री प्रेस जर्नल आदी इंग्रजी
वृत्तपत्रांबरोबरच लोकमत, पुढारी, सामना इत्यादी आघाडीच्या मराठी
वृत्तपत्रांतून स्वतःचा ठसा उमटवला. लालबागचा राजा गणेश मंडळातील
भ्रष्टाचार, समृद्धी जीवनचा महाघोटाळा, मुंबई विद्यापीठातील अनेक गैरप्रकार
त्यांनी उघडकीस आणले. केवळ भांडाफोडीवर न थांबता, सातत्याने पाठपुरावा
करून संबंधित यंत्रणेला कारवाई करण्यास भाग पाडले. सरकारच्या कारभारावर
लेखणीचे फटकारे मारण्यातही त्यांनी कधी संकोच केला नाही.
निवासी
संपादक या नात्याने उन्मेष गुजराथी यांच्याकडे मुंबई आवृत्तीची संपूर्ण
जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी बरोबरच आता हिंदी माध्यमात
त्यांचे पदार्पण चर्चेचा विषय आहे. बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना
सोबत घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे दबंग दुनियाच्या टीममध्ये
उत्साहाचे वातावरण आहे.