मुंबई
- महाराष्ट्र 1 मधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे नेमके
कुठे जॉईन होणार ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, मात्र ते आता कुठेही जॉईन
होणार नाहीत तर स्वतःचे वेब पोर्टल सुरु करणार आहेत... याबाबतची घोषणा
वागळे यांनी स्वतः केली आहे.
IBN लोकमत मध्ये सात
वर्षे घालवल्यावर मी मराठी करून वागळे महाराष्ट्र 1 मध्ये जॉईन झाले होते,
मात्र एका वर्षातच त्यांनी हे चॅनेल सोडले, त्यानंतर ते नेमके कुठे जॉईन
होणार, याकडे लक्ष लागले होते, मात्र सध्या चॅनेलमध्ये स्पेस नसल्याने
वागळे यांनी, स्वतःचे वेब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वेब पोर्टल जनतेकडून पैसे गोळा करून, सुरू करणार असल्याचे ट्विट वागळे यांनी केले आहे.वागळे म्हणतात की,
Dear all,
I am
starting a foundation to promote people’s media. It will have various
activities. One of them is a web portal with the help of crowd funding.
We have to use this new medium powerfully.
Please support and spread word.
Nikhil Wagle
वागळे
यांचे वेब पोर्टल कसे राहणार, नाव काय राहणार, त्याला कितपत प्रतिसाद
मिळणार ? याबाबतची माहिती बेरक्यावर प्रसिद्ध होईल, तोपर्यंत बाय बाय ...