मुंबई - एक पाऊल मागे वाहिनीतली ह-या (काळू मामा)
आणि ना-या (शुगरे) ही गँग पुन्हा सक्रीय झाली आहे. नवे संपादक विजय कुवळेकर यांनी ह-या, ना-याला जीवनदान
दिलं. तसंही या आधीच्या सगळ्याच संपादकांनी ह-या, ना-याला जवळ केलं
होतं. पण डॉक्टरने ह-या, ना-याला एकदा जोरदार तडाखा दिला होता. दोघांना घरचा
रस्ता दाखवला होता. पण दोन्ही गँगच्या शार्पशूटरनी डॉक्टरकडे गोळीबार करून ह-या ना-याला
पुन्हा कामावर घ्यायला लावलं होतं.
आता ह-या ना-या गँग पुन्हा दहशत पसरवू लागली
आहे. या गँगमध्ये नसलेल्यांना कायम नाईट शिफ्ट लावली जात आहे. तर या गँगमध्ये असणा-यांची
चांदी सुरू आहे. डॉक्टरच्या जवळ असणारं तोंडपाटीलकी दाम्पत्य नेटवर्क 18 - लोकमतच्या
मार्गावर आहे. हे दाम्पत्य पुन्हा डॉक्टरचा
हात पकडून नेटवर्क 18 - लोकमतमध्ये घुसण्याची
चर्चा आहे. तसंच एक पाऊल मागेचा निनादही नेटवर्क
18 - लोकमतध्ये ऐकायला येणार आहे. डॉ़क्टरच्या जवळ असलेला भाऊही लवकरच पक्षांतर करणार
असल्याची बातमी आहे.
चॅनलचे कार्यकारी संपादक म्हणून येणारे चंद्रशेखर कुलकणी जॉईन
होण्यापूर्वीच आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या हृदयावर बायपास सर्जरी
झाल्याने ते आजारातून उठले नाहीत आणि आता तर ते जॉईन होण्याची शक्यता
मावळली आहे. त्यामुळे हऱ्या - नाऱ्याला आनंद झाला असून आता आपलेच अधिराज्य
आहे, असे वाटू लागले आहे.
टीआरपी घसरलाएक पाऊल मागे चॅनेलचा टीआरपी चांगलाच घसरला आहे. हे चॅनल एक किंवा दोन वर राहत होते पण ते चक्क तीन वर गेले आहे. याचे कारण पूर्वी हे चॅनल डीटीएच वर फ्री होते पण आता ते पेड करण्यात आले आहे. त्यामुळे टीआरपी घसरला आहे. मात्र ते डॉक्टरच्या पथ्यावर पडले आहे. सगळ्यांना वाटते डॉक्टरने चॅनल सोडल्यामुळे टीआरपी घसरला आहे. मात्र चॅनल फ्री ऐवजी पेड झाल्यामुळे टीआरपी घसरला आहे.