गडचिरोली- गडचिरोली राज्याच्या टोकावर असलेला आणि नेहमी नक्षलवाद्याच्या कारवायांनी
चर्चेत असलेला जिल्हा आहे माञ या कारवायासह इथल्या घडामोडी राज्याला
कळवणारे गडचिरोलीतले पञकार आता स्वतः चर्चेत आले आहेत. या जिल्हयातल्या
सगळया विभागीय वृत्तपञासह एका चॅनेलच्या प्रतिनिधीची विदेशवारीच्या बातमीने
व्यवस्थापनाला अस्वस्थ करुन टाकले आहे.
गेल्या पाच दिवसापुर्वी गडचिरोलीतले 12 जिल्हा प्रतिनिधी चक्क सिंगापुर बॅकाक आणि पटायाच्या दौ-यावर गेले आहेत. नक्षलवाद्याच्या बातम्यासह इतर बातम्या करताना आलेला थकवा दुर करण्यासाठी हा विदेश दौरा असल्याचे बोलले जात असले तरी या जिल्हा प्रतिनिधीच्या हाताखाली काम करणा-या काहीनी थेट नागपुरच्या मुख्य कार्यालयात या दौ-यासंदर्भात सांगितल्याने व्यवस्थापन चक्रावुन गेले आहे. हे सगळे सुटी टाकुन गेले असले तरी त्यानी नागपुर कार्यालयाला विदेश दौ-याची कल्पना दिली नव्हती. गडचिरोली कार्यालयात या जिल्हा प्रतिनीधीनी कामासाठी राबवुनही पगारासंदर्भात योग्य भुमिका न घेतल्याने नाराज असलेल्था सहका-यानी थेट नागपुर कार्यालयाच माहीती दिली .अखेर वृत्तपञातल्या नागपुरातल्या वरिष्ठानी या दौ-याची माहीती घेतल्यावर एक दोन नव्हे तर अकरा पञकार सामुहीकपणे विदेशवारीवर गेले असुन त्या दौ-याचे प्रायोजक ही एटापल्ली तालुक्यात पहाडावर लोहखनिजाचे उत्खनन करणारी कंपनी असल्याची माहीती मिळाल्याने नागपुर कार्यालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे .
एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडावर लोहखनिजाच उत्खनन वादग्रस्त विषय असुन या तालुक्यातल्या जनतेसह ग्रामसभांचा उत्खननाला विरोध असुन आदीवासी नागरीकांनी नेहमीच आंदोलनाची भुमिका घेतली आहे. अशा संवेदनशील भागातल्या घडामोडी माध्यमामधुन येऊ नये याची काळजी लोहखनिज उत्खनन करण्याची जबाबदारी असणा-यानी घेतली होती त्यातुन या पञकाराना विशेष पॅकेजमधुन हा दौरा घडवल्याचे नागपुर कार्यालयाला काही कार्यालयीन पञकारासह जाहीरातीची जबाबदारी असलेल्या कार्यालयीन प्रमुखाने कळवले असुन यात कहर म्हणजे पुण्याच्या नगरातल्या या वृत्तपञाच्या जिल्हा प्रतिनिधी ऐवजी गडचिरोली शहराच्या वृत्तसंकलनाची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधीला नेल्याने जिल्हयाची जबाबदारी असलेले प्रतिनिधी संतप्त झाले असुन त्यानीही नागपुरच्या कार्यालयाला ही बाब कळवली आहे तर ही बातमी गडचिरोली शहरासह जिल्हयातल्या पञकारासह नागपुरातल्या वृत्तपञसृष्टीत पसरली आहे. एकुणच एका कंपनीच्या गैरव्यवहाराला आणि जनतेचा विरोध असलेल्या प्रकल्पाची पाठराखण करण्याचा हा प्रकार असुन दौ-यावरुन परतल्यानंतर व्यवस्थापन यावर भुमिका घेत याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे माञ या प्रतिनिधीच्या हाताखाली काम करणारे सहाय्यक पञकार सर्वाधिक नाराज झाले आहेत.