थोडक्यात ...

पुण्यनगरी अपडेट

पुणे  संपादक गोपाळ जोशी आणि निवासी सुनील देशपांडे यांची  पुण्यनगरीतून  हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुण्यनगरीचा पुण्यात खप पचंड घसरला आहे.  त्यामुळे  शिंगोटे बाबा संतापले आहेत.या कारणास्तव  बाबानी पुण्यात मुक्काम वाढवला आहे.


संजय आवटे यांची बदली
 
मुंबई - सामचे संपादक संजय आवटे यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे.
त्यांच्याकडील सामचा पदभार काढण्यात आला आहे, त्यांच्याकडे  पुण्यात सकाळमध्ये  "डेव्हलपमेंट आणि रिसर्च" विभाग  देण्यात आला आहे ...

नाशिकचा गांवकरी अखेर बंद

गेल्या ७०  वर्षांपासून सुरु असलेला नाशिकचा गावकरी अखेर दोन महिन्यापासून बंद पडला आहे. गावकरी म्हणजे नाशिक आणि नाशिक म्हणजे गावकरी असे समीकरण आता बदलले आहे. मालक वंदन पोतनीस एका फसवणूक प्रकरणात फरार आहेत. वीज बिल आणि पाणी पट्टी थकल्यामुळे वीज आणि पाणी खंडित झाले आहे. कामगाराची देणी थकली आहेत. जवळपास ७० कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. त्यांना उपासमारीची वेळ आली आहे.