दैनिक एकमतमधून १५ कर्मचाऱ्यांना नारळ ...

लातूर - राजकारणाशी संबंधित आलेल्या दैनिक एकमतमध्ये आता गलिच्छ राजकरण सुरु झाले आहे. निष्क्रियेचा ठपका ठेवत १५ कर्मचाऱ्यांना नारळ  देण्यात आला आहे. त्यात दोन महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अनेक वर्ष काम करूनही आम्ही निष्क्रिय कसे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

गेल्या १८ ते २०  वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. अगोदरच तीन - तेरा वाजलेल्या एकमतमध्ये संपादक  मंगेश देशपांडे - डोंग्रजकर सपशेल अपयशी ठरले आहेत.
दैनिक एकमतची अनेक कार्यलये तोट्यात सुरु आहेत. काही जिल्हा प्रतिनिधी फक्त पाट्या टाकण्याचे काम करीत आहेत, मात्र त्याकडे कानाडोळा केला जातोय. त्यामुळे पेपर तोट्यात आणि गाळात जात आहे. आमदार अमित देशमुख यांची धूळफेक करून संपादक आपले दिवस मोजून पगार घट्ट करीत आहेत. स्वतःच्या निष्क्रियेचा ठपका कर्मचाऱ्यावर फोडला जात आहे.