मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक
तुळशीदास भोईटे
यांनी अखेर चॅनलला जय महाराष्ट्र केला आहे. आपण लोकमत ऑनलाईनला संपादक म्हणून जॉईन होणार आहोत , अशी माहिती दस्तुरखुद्द भोईटे यांनी दिली आहे.
भोईटे
त्यांच्या राजीनाम्यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे जय
महाराष्ट्र चॅनलमध्ये पगारी वेळेवर होत नाहीत आणि दुसरे म्हणजे चॅनलने ANI
वृत्तसंस्थेचे बिल न भरल्यामुळे बातम्याचे फुटेज येत नाही आणि त्यामुळे
काम करण्यास अवघड झाले होते .
दुसरीकडे चॅनलचा टीआरपी वाढत नसल्यामुळे मॅनेजमेंटही भोईटे यांच्यावर नाराज होते,दोन महिन्यात टीआरपी वाढवा अन्यथा दुसरीकडे काम पाहा असा अल्टिमेटही मॅनेजमेंटने काही दिवसापूर्वी दिला होता. त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भोईटे यांनी अखेर राजीनामा देणे पसंद केले.

जय महाराष्ट्र चॅनलच्या ऑफिसजवळच राहतात, मग राजीनामा कसा दिला, हे एक
कोडेच आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला
असून काही जणांनी पेढे वाटल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे. भोईटे
काही कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत होते, न्यूज रूम मध्ये शिव्या
घालत होते, त्यामुळे अनेक माणसे निघून गेली आणि तोडली गेली, अशी माहिती
प्राप्त झाली आहे.
चंद्रशेखर कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्यानंतर
लोकमत ऑनलाईनचे संपादकपद रिक्त होते, या पदावरच भोईटे जाणार आहेत. अशी माहिती भोईटे यांनी स्वतःहून दिली आहे.
राजीनाम्याची दुसरी वेळजेव्हा जय महाराष्ट्र्र चॅनल सुरु झाले तेव्हा तुळशीदास भोईटे कार्यकारी संपादक आणि नंतर संपादक झाले होते. त्यानंतर ते मी मराठी, जनशक्ती करून पुन्हा जय महाराष्ट्रमध्ये आले होते. जय महाराष्ट्र मध्ये इन - आऊट करण्याची भोईटे यांची ही दुसरी वेळ आहे.