फेक न्यूज मागे...

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे एप्रिल फुल !!
 फेक न्यूजबाबतचा 'तो' निर्णय पंतप्रधानांकडून मागे

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, खोट्या बातम्या म्हणजे 'फेक न्यूज' देणाऱ्या पत्रकारांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र, याबाबतचे परिपत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागे घेण्यात आले आहे.

जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले, की खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण बघता एखाद्या पत्रकाराने बातमी देण्याबाबत निकष कडक करण्यात आले आहेत. खोटी बातमी प्रसिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराची मान्यता प्रथम सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आणि त्यानंतर अशी बातमी प्रसिद्ध झाल्यास वर्षभरासाठी मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा असे करताना सापडल्यास संबंधित पत्रकाराची मान्यताच कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असे त्या परिपत्रकात म्हटले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी याबाबतचे परिपत्रक रद्द केले असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.