सहायक कामगार आयुक्तांची दैनिक एकमत व्यवस्थापनाला नोटीस

लातूर- येथील इंडो एंटरप्रायजेस प्रा. लि. संचलित पुरोगामी विचाराचे दैनिक एकमत या वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने 15 फेब्रुवारी 2018 रोजी गेल्या 20 ते 24 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्याना कुठलीही पूर्व सूचना न देता अचानकपणे नोकरीवरून काढून टाकले.त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली.  दैनिक एकमतच्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्तांकडे दाद मागून माजीठिया वेतन आयोगानुसार मागील अनेक वर्षाचे एरियर व इतर सवलती मिळवून देण्याची मागणी केली. तसे प्रस्ताव देखील कायदेशीररित्या दाखल केले आहेत.
त्यामुळे कामगार आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन दैनिक एकमत व्यवस्थापनाला नोटीस बजावली असून येत्या 20 एप्रिल रोजी होणारया सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत