मुंबई - नंबर 1 चा दावा करणारा एबीपी माझा चॅनल सामच्या काही लोकप्रिय शोची कॉपी करीत असल्याने मीडियात चर्चेचा विषय झालाय.
निलेश
खरे यांनी साम चॅनलची सूत्रे हाती घेतल्यापासून या चॅनेलचा टीआरपी
दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो आता 27 वर गेला आहे. व्हायरल सत्य आणि
स्पॉट लाईट हे दोन शो जबरदस्त लोकप्रिय झाले असून , या दोन्ही शो चा
टीआरपी नंबर 1 आहे.तसेच येथे नोकरी मिळेल हा शोही चांगलाच लोकप्रिय झाला
आहे.
साम चॅनेल स्पर्धेत
येत असल्यामुळे एबीपी माझा चॅनलची पायाखालील वाळू घसरली आहे. सामवर व्हायरल
सत्य आहे तर एबीपी माझा वायरल चेक नावाचा शो सुरू करीत आहे.
सामवर स्पॉट लाईट शो आहे तर एबीपी माझा स्पेशल रिपोर्ट नावाचा शो सुरू केला असून त्याचे अँकरिंग अभिजित कारंडे करीत आहे.
येथे नोकरी मिळेलची कॉपी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एबीपी माझा चॅनेल भविष्यात कॉपी चॅनल म्हणून ओळखले जावू लागल्यास नवल वाटू नये.
जाता जाता - एबीपी माझा बरोबर झी 24 तासही व्हायरल सत्य आणि नोकरी विषयक शो ची कॉपी करण्यासाठी प्लॅनिंग करत आहे.