अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो...
सांगोला - एखादे
वृत्तपत्र
प्रसिद्ध करताना आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे डिक्लेरेशन सादर करतो, त्यात वृत्तपत्र कुठे प्रिंट करणार आणि
प्रसिद्ध करणार याचे शपथपत्र देतो. पण दिलेल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये सदर
वृत्तपत्र प्रिंट न करता अन्यत्र प्रिंट केल्यास तो कायद्यानुसार गुन्हा
असून तो बडगा सांगोला उपविभागीय अधिकरी यांनी उचलला आहे.
सांगोला येथील दैनिक किर्णोदयचे संपादक किशोर म्हमाणे यांच्यावर सांगोला
पोलीस स्टेशनला उपविभागीय अधिकाऱ्याची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे कार्यालय सील केले आहे.
राज्यात अश्याप्रकारे पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने लघु वृत्तपत्र काढणाऱ्या संपादक आणि पत्रकारात खळबळ उडाली आहे.