मुंबई - झी २४ तास केवळ माझ्यामुळे नंबर १ झाले असा दावा करणाऱ्या डॉ.
उदय निरगुडकर यांचा पाण्याचा बुडबुडा अखेर फुटला आहे. न्यूज १८ लोकमत जॉईन
करून सहा महिने झाले तरी हे चॅनल पाचव्या क्रमांकावरच अडकले आहे. दुसरीकडे साम चॅनलची घोडदौड सुरूच आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या न्यूज १८ लोकमतकडे पैश्याची कमी नाही. त्यात
वितरण चांगले आहे. अनेक तगडे अँकर आहेत, तरीही हे चॅनल टीआरपीमध्ये खूप
मागे आहे. झी २४ तास माझ्यामुळं नंबर १ झाले असा दावा करणारे डॉ. उदय
निरगुडकर १२/१२/१७ रोजी जॉइन झाले. त्यांच्याकडून चॅनल व्यवस्थापनाच्या खूप
अपेक्षा होत्या. मात्र त्या फोल ठरल्या आहेत.
या
चॅनलचा टीआरपी १२ ते १४ मध्ये अडकला आहे आणि कधी चौथा तर कधी पाचव्या
क्रमांकावर हे चॅनल रेंगाळत आहे. डॉ. निरगुडकर यांना स्वतःला टीव्हीवर
चमकणे खूप आवडते, त्यासाठी नको तो आटापिटा सुरु असतो. त्यांचा डिबेट शो
अत्यंत भंगार असतो. त्यांच्या शो चा टीआरपी खूप कमी आहे. बातम्यापेक्षा
त्यांच्या डिबेट शोला महत्व दिले जात असल्यामुळे चॅनलची माती होत आहे.
चॅनलमध्ये अनेक अँकर आणि काही कर्मचारी सलग
१० वर्षांपासून काम करीत आहेत.त्यांच्यात एकप्रकारची सुस्ती आली आहे. आम्ही
येथे सिनिअर आहोत, या घमेंडीत ते नव्या कर्मचाऱ्याना कमी लेखत आहेत.जुने
काम करीत नाहीत आणि नव्यांना नवे काही करू देत नाहीत. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरु आहे. डॉ निरगुडकरकडे नवीन व्हिजन नाही. तोच तो पणामुळे चॅनल टीआरपी मध्ये मार खात आहे.
दुसरीकडे
सामची
घोडदौड सुरुच आहे. सलग दोन आठवडे हे चॅनल टीआरपी मध्ये दुसरे आले आहे.
नंबर १ असलेल्या एबीपी माझा आणि साममध्ये फक्त २. ४ चा फरक आहे. संपादक
निलेश खरे यांनी नवी टीम उभी करून सामला उभारी दिली आहे. अपुरा कर्मचारी
वर्ग आणि अपुऱ्या सुविधा असताना सामने जबरदस्त कामगिरी केली आहे. एकीकडे
साममध्ये उत्साह असताना न्यूज १८ लोकमतमध्ये निरुत्साह दिसत आहे.