मुंबई - झी २४ तासचा अँकर
गिरीश निकम (४१) याला क्राईमच्या बातम्या देता देता प्रत्यक्ष थरारक अनुभव आला.पुण्याहून
खारघरला परत
येत चार लुटारूंनी त्यास सिनेस्टाईल लुटलं. या प्रकारामुळं पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खारघरमध्ये राहणारा झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) काल सायंकाळी पुण्याहून खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेला होता. रात्री १० च्या सुमारास तो डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खासगी प्रवासी वाहतुकीची गाडी असून त्यात केवळ एका प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीश हेही या गाडीने अडीचशे रुपयांमध्ये खारघर येथे जाण्यास तयार झाले. यावेळी गिरीश पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसले, तेव्हा त्या गाडीत चालकासह चौघे बसले होते. त्यानंतर ही गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने लघवीच्या निमित्ताने कार थांबविली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजूला बसला आणि त्याने गिरीशच्या कमरेला बंदुक लावून त्याला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाइल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट काढून घेतले. तसेच, एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डही विचारून घेतला. त्यानंतर लुटारूंनी काही किमीनंतर गाडी थांबवून गिरीशच्या खात्यातून ४१ हजारांची रक्कम काढून घेतली. नंतर पोलिसांनी गिरीशला त्याचा मोबाइल आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. मात्र त्या मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. अखेर त्यांनी एका रिक्षाचालकाच्या मदतीने कळंबोली पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.
या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.