बुलढाणा जिल्ह्यातील ३ ऑपरेटर आणि एक कार्यालय प्रमुखाला नारळ !
बुलढाणा- शेठजीच्या लोकमत मधून आज बुलढाणा जिल्ह्यातील ४ जणांना आणि अकोला जिल्ह्यातील एकाला कामावर नारळ देण्यात आला. .
१५ ते १८ वर्षांपासून काम करणाऱ्या यातील काही कर्मचाऱ्यांना अचानकपणे
कामावरून कमी करण्यात आल्याने एक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे.
दुसरीकडे कंपनीच्या या हेकेखोर वृत्ती विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले जाणार असल्याचे समजते.
वृत्तपत्र
क्षेत्राला लागलेली घरघर आणि त्यात बुलढाणा जिल्ह्याला जाहिरातीच्या
कमाईपेक्षा खर्च अधिक होत असल्याने लोकमत ने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
दाखवण्यास सुरुवात केली आहे. अकोला येथे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन एच आर
मॅनेजर येवतकर यांनी बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे जाहिरात व्यवस्थापक शरद
गावंडे, ऑपरेटर प्रवीण थोरात, खामगाव कार्यालयातील ऑपरेटर मो.एजाज आणि आणखी
एका ऑपरेटर ला आपण उद्यापासून कामावर येऊ नका असा आदेश देण्यात दिला आहे. शिवाय त्यांच्या समोर राजीनामे ठेऊन त्यांच्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे मागील १५ ते १८ वर्षांपासून यातील काही कर्मचारी कार्यरत होते. त्यांना मागील वदर्डाच्या खाजगी कंपनी च्या कामावर कंत्राटी म्हणून
दाखवण्यात आले आणि यावर्षी थेट काढून टाकण्यात आले. यामुळे एकाच खळबळ
उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात देशोन्नती या वृत्तपत्राशी स्पर्धा
करण्यासाठी अनेक उपाय योजना लोकमतने राबविल्या मात्र त्यात त्यांना यश आले
नाही म्हणून आता उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने लोकमतने आवरते
घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी बैठकीत एक ऑपरेटर ला नारळ देण्याबाबत
सुनावताच त्याची प्रकृती खालावली होती. कालपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मात्र या धोरणाविरोधात काही कर्मचारी न्यायालयाचे दार ठोठावण्यात येणार असल्याचे समजते.