झी 24 तास आणि न्यूज 18 लोकमत तोंडावर आपटले

मुंबई : चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) हायड्रोजन टँकमध्ये आज (बुधवार) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे काही किलोमीटरच्या परीसराला हादरे बसले. या स्फोटात 21 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या दुर्दैवी घटनेची ब्रेकिंग न्यूज चालवताना राहा एक पाऊल पुढे म्हणणारे  झी 24 तास आणि महाराष्ट्राचं महाचॅनल म्हणणारे न्यूज 18 लोकमत चॅनल चक्क तोंडावर आपटले. त्यांनी या घटनेचा Exclusive म्हणून चक्क  फेक व्हिडीओ वापरला , खरं तो व्हिडीओ बाहेरच्या देशातील  सन 2013 मधील घटनेचा असल्याचं समोर आलं आहे.

 
ही  गंभीर चूक लक्षात येताच  झी 24 तासने माफी मागितली आहे  पण न्यूज 18 लोकमतने अजून तरी माफी मागितली नाही. ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर देण्याच्या नादात झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत चॅनल फेक व्हिडीओ वापरत असल्याने त्यांची विश्वासहर्ता लोप पावत चालली आहे.