सचिन जवळकोटे सोलापूरचे निवासी संपादक
औरंगाबाद
- राजा माने यांच्या पदाचा आणि ठिकाणाचा घोळ अखेर मिटला आहे. माने यांना
बाबूजीनी लोकमतचे राजकीय संपादक म्हणून मान्यता दिली आहे. 15 दिवस
औरंगाबाद आणि 15 दिवस मुंबई असा प्रवास राहणार आहे.
काल औरंगाबादेत बाबूजींनी लोकमतच्या सर्व आवृत्तीच्या संपादकांची बैठक घेतली, त्यात ही घोषणा करण्यात आली.
राजा
माने गेले काही वर्षे सोलापूर आवृत्तीचे संपादक होते, त्यांची बदली
करण्यात आल्यानंतर कोणते पद मिळणार आणि आणि कोणते ठिकाण राहणार ? याबाबत मानबिंदूमध्ये उत्सुकता होती.
सचिन जवळकोटे निवासी संपादक
सोलापूरात
राजा माने यांच्या जागी आलेल्या सचिन जवळकोटे यांना निवासी संपादक करण्यात आले आहे, त्यांच्यावर संपादक म्हणून कोल्हापूर
आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांचे नियंत्रण राहणार आहे.
जवळकोटे हे सातारा आवृत्तीत
गेल्या 5 वर्षांपासून आवृत्ती प्रमुख होते, ते मूळचे सोलापूरचे आहेत
.तेव्हा आणि आताही संपादक म्हणून वसंत भोसले यांच्या हाताखाली काम करावे
लागणार आहे. जवळकोटे यांना थोडीफार पदोन्नती मिळाली आहे.