नवी दिल्ली
- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
नय्यर यांना 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात
झाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर
पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या
सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना
अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.
जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी त्यांची ओळख
होती. त्यांनी जवळपास 14 भाषेतील 80 वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे.
तसेच, आणीबाणी आणि भारत-पाकिस्तानवर पुस्तकही लिहिले आहे. कुलदीप नय्यर
यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला होता. नॉर्थवेस्टर्न
युनिव्हर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी
उर्दू रिपोर्टर म्हणून काम केले.
पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात कुलदीप नय्यर हे उर्दू वर्तमानपत्रासाठी काम करायचे. दिल्लीतील ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवाधिकार कार्यकर्ते आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट १९९७ ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले होते. १९९० मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे कुलदीप नय्यर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांना 1990 मध्ये ब्रिटनमध्ये त्यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, 1997 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना पाठविण्यात आले होते.
कुलदीप नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. तसेच, बियाँड द लाइन्स, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, इंडिया-द क्रिटिकल इयर्स, द जजमेंट-इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा यासारख्या विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.