प्रशांत दीक्षित यांचा दिव्य मराठीला रामराम

औरंगाबाद -स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांनी दिव्य मराठीला राम राम ठोकला आहे. ते लवकरच  लोकमतच्या पुणे आवृत्तीत संपादक म्हणून जॉईन होणार आहेत. दरम्यान दिव्य मराठीमध्ये दीक्षित यांची जागा कोण घेणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

दिव्य  मराठीने मजिठिया आयोग लागू न केल्यामुळे जवळपास २० कर्मचारी कोर्टात गेले आहेत. सर्व निकाल दिव्य मराठीच्या विरोधात  गेल्यामुळे भोपाळसेठ स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांच्यावर नाराज होते. कर्मचाऱ्यांना हुसकावण्यात  दीक्षित यांचा हात असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला  होता. त्यामुळे गेले तीन महिने दिव्य मराठी प्रशासन यावर कमिटी नेमून चौकशी करत होती. तत्पूर्वीच दीक्षित यांनी दिव्य मराठीला राम राम ठोकला आहे.
दीक्षित लवकरच लोकमतच्या  पुणे आवृत्तीत संपादक म्हणून जॉईन होणार आहेत, दरम्यान पुणे लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांची जळगावला बदली होण्याची शक्यता आहे.