मुंबई - संजय आवटे यांचा साम आणि सकाळ माध्यम समूहाशी काहीही संबंध नाही, मात्र आवटे आपली
ओळख करून देताना संपादक, साम असे करून देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले
जात आहे. आवटे यांनी सामचा नामोल्लेख टाळावा अशी तंबी सकाळ प्रशासनाने
दिल्याचे समजले.
पत्रकार संजय आवटे यांना
साम मधून सहा महिन्यापूर्वी कार्यमुक्त करण्यात आले आहे तर सकाळ माध्यम
समूहातून त्याना ३० ऑगस्ट रोजी रीम्हव्हू करण्यात आले आहे. असे असताना
त्यांनी काढलेल्या पुस्तकाच्या निमंत्रण पत्रिकेवर संजय आवटे यांच्या
नावासमोर संपादक, साम असा उल्लेख केला आहे.
आवटे यांनी, We The Change नावाचे पुस्तक काढले असून हे पुस्तक खपावे यासाठी त्यांनी साम आणि सकाळ माध्यम समूहाशी संबंध जोडून नावाचा
गैरवापर सुरु केला आहे. कालच त्यांना सकाळ प्रशासनाने कानउघाडणी केली असून
यापुढे सामचा उल्लेख केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.