पुणे - क्लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच
मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी
अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे ‘सकाळ’चे सर्व दिवाळी अंक
‘ॲमेझॉन डॉट इन’वर प्रसिद्धिपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत.
जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून जीवनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्लेषण आणि अनुभवसंपन्न विचार ‘शब्ददीप’, ‘ॲग्रोवन’, ‘सकाळ साप्ताहिक’, ‘तनिष्का’ आणि ‘प्रीमियर’ या दिवाळी अंकांमध्ये आहेत; शिवाय ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे, ती म्हणजे ‘सरकारनामा’ या राजकीय विशेषांकाची!
महासर्वेक्षण - सरकारनामा
सुजाण मराठी वाचकांसाठी ‘सरकारनामा’ ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी ‘सरकारनामा’च्या दिवाळी अंकामध्ये आहे. २०१९ मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार, याबद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही अंकामध्ये प्रसिद्ध होईल.
आयडिया ऑफ इंडिया : शब्ददीप
सध्याची सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे नेमका काय आहे भारत? हे उलगडणारा परिसंवाद ‘आयडिया ऑफ इंडिया’ हे शब्ददीपचे विशेष आकर्षण असेल. त्याचबरोबर लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासामध्ये भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज या दिवाळी अंकात असतील.
प्रश्नांची उत्तरे - ॲग्रोवन
शेतीतील समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशोगाथांनी ‘ॲग्रोवन’चा दिवाळी अंक सजलेला आहे. मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा अंकात आहेत. शिवाय कृषी क्षेत्रातील नवनवे शोध, बदलणारी शेती यावरही मौलिक विचारधन या अंकात आहेत.
सकाळ साप्ताहिक, तनिष्का आणि प्रीमियर
याशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत ‘सकाळ साप्ताहिक’मधून, तर खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल ‘तनिष्का’मध्ये..! मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन, त्याजोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे ‘प्रीमियर’ हा दिवाळी अंक.. हे सर्व अंक ‘ॲमेझॉन’वर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्याने यावर सवलतीच्या दरात घरपोच अंक मिळविण्याची सुवर्णसंधी वाचकांसाठी आहे.
सकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर !
वाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा..
शब्ददीप: https://goo.gl/XwXccB
सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अॅग्रोवन: https://goo.gl/Jn7VTF
साप्ताहिक सकाळ: https://goo.gl/66fLKh
तनिष्का: https://goo.gl/793JRP
प्रिमीयर: https://goo.gl/wA31Nx