पुणे मिरर दैनिकात #मीटू...!

पुण्यातील नामंकित बेनेट कोलमन अँड कंपनी लिमीटेडच्या 'पुणे मिरर' इंग्रजी दैनिकात एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने सोबतच्या एका ज्येष्ठ पत्रकारावर #मीटू चा आरोप केला. संबंधित पत्रकाराच्या वाढीव 'वाणी'तुन सातत्याने सहकारी महिलांना 'डार्लिंग, स्वीटहार्ट', असे शब्द वापरत असे. असे संभाषण हा अश्लिल शेरेबाजीचा प्रकार असुन हा देखील एकप्रकारे लैंगिक व मानसिक छळ असल्याचा उल्लेख करत पिडीत महिलेने व्यवस्थापन आणि मुख्य संपादिकेकडे लेखी तक्रार केली होती.

यानंतर वायफळ बडबडयुक्त 'वाणी'मुळे संबंधित पत्रकाराची चांगलीच बोबडी वळाली होती. परंतु कारवाईमुळे बीसीसीएल ग्रुपचे नाव बदनाम होईल, या भितीपोटी संबंधित महिला संपादिकेने निवासी महिला संपादिकेच्या मदतीने दोघांशी चर्चा व विनवणी करुन या प्रकरणावर समेट घडवित अखेर पडदा टाकला. 
----------