चौथास्तंभ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा

औरंगाबाद - अप्रतिम मीडिया फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील पत्रकारांना विशेष पत्रकारितेबद्दल दिल्या जाणार्या चौथास्तंभ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. बीट जर्नालिझम आणि विशिष्ट विषय-समस्यांचा वेध घेणार्या दैनिके, मासिके, साप्ताहिके व वृत्तवाहिन्या, रेडिओ, वेब जर्नालिझम व नवमाध्यमांतील पत्रकार, छायाचित्रकारांना चौथास्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

मनुष्य बळ विकास व्यवस्थापन तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून माध्यम संस्थांच्या वतीने राबविण्यात येणार्या उपक‘म-कार्यक‘मांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणार्यांचीही नोंद घेतली जाते. प्रसार माध्यम क्षेत्रात पूर्णवेळ वा अर्धवेळ किंवा मुक्त पत्रकार, सिटिझन जर्नालिस्ट म्हणून काम करणारे गावपातळीपासून ते माध्यम संस्थेच्या मु‘य कार्यालयातील पत्रकार आपला प्रस्ताव पाठवू शकतात. पुरस्कारासाठी निवड समितीकडून पात्र ठरणार्या पत्रकारांना गौरविण्यात येईल. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पर्यावरण, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग-व्यापार, कि‘डा, संस्कृती, मनोरंजन, गुन्हेगारी या अन्य कोणत्याही एका क्षेत्रातील नियमित वा प्रासंगिक वृत्त संकलन, स्पेशल स्टोरी, शोध पत्रकारिता इत्यादिसाठी ती ती उल्लेखनीय कामगिरी व त्याची अन्य संबंधित घटकांकडून घेतली गेलेली दखल लक्षात घेतली जाते.

पत्रकारांनी आपल्या 2017 व 2018 या दोन कॅलेंडर वर्षांमध्ये प्रकाशित-प्रसारित झालेल्या वृत्तमालिका, विशेष लेख, विश्लेषण इत्यादि संपादकांच्या शिफारशीसह तसेच वैयक्तिक संपूर्ण माहिती व आपल्या छायाचित्रासह पीडिएफ फॉरमॅटमध्ये व इलेक्ट्रॉनिक मीडियातील संबंधितांनी ऑडिओ-व्हिडिओ गुगलद्वारे इमेल ( chauthastambh@gmail.com ) करावा. जानेवारी 2019 मध्ये अप्रतिम मीडियाच्या वतीने राज्यातील अनुभवी व अननुभवी पत्रकार तसेच सिटीझन जर्नालिस्ट इत्यादि सर्व पत्रकारांसाठी शाश्वत विकास आणि पत्रकारिता या विषयावर राज्यस्तरिय विशेष कार्यशाळा होणार असून त्याचदिवशी चौथास्तंभ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत 20 डिसेंबर 2018 पर्यंतच आहे.