पद्मश्रींसह त्यांचे सुपुत्र, जावई यांच्या पायाशी अनेकवेळा लोटंगण घालून 'उदय भविष्यपत्रातून' हकालपट्टी झाल्यानंतर 'सबका बंधू' 'मित्रमंडळी'त आश्रयाला आला. या 'सेटींगबाजा'ला पुण्याची मनसबदारीही मिळाली. पण 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' ही म्हण जणू काही 'सबका बंधू'ला डोळ्यापुढे ठेवून केली काय असेच म्हणावे लागेल.
कारण 'सबका बंधू' आणि 'दरोडे'खोर यांच्या 'रोज सकाळी गिऱ्हाईक धूंडू' कामगिरीपाई त्याच्या ताटाखालच्या मांजराने 'जोश'पूर्ण उच्छाद मांडलाय. पद्मश्रींनी वारंवार डोक्यात जोडे मारून देखील बंधू, 'दरोडे'खोर आणि त्याचं मांजर सुधारायचं नाव घेईना. एक बातमी न छापून एक प्रकरण दाबण्यासाठी आणि त्यातून 'लक्ष्मीदर्शनासाठी' एका मातब्बर राजकीय व्यक्तीसोबतची सेटिंग फसली. त्यामुळे बंधूला 'मान' वर 'कर'ता येत नाही. पद्मश्रींच्या हे लक्षात आल्यावर या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आता निष्पाप बातमीदारांचा छळ सुरू केला आहे. हाकलून दिलेल्या बंधू, 'दरोडे'खोर आणि मांजरांच्या उचापतीमुळे पद्मश्रींच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे. असं कळतंय, की एक वादग्रस्त टेप व्यवस्थापनाच्या हाती आलीय; त्यात 'मारवाडी' काही मॅनेज होत नाही; पण अडीच लाखात 'बंधू'ला पटविल्याचा उल्लेख आहे. हे अडीच लाख बंधूने खाल्ले की 'जोशा'त असलेल्या रिपोर्टर्सना छळणाऱ्याने की सरकारी अधिकारयांवर 'दरोडे' घालणाऱ्या 'बातमीचोराने'? यावरून सध्या लुटारू टोळीचा 'पुढारी' शोधण्याचे काम सुरू आहे. मारवाड्यामुळे लुटारू गँगला जणू 'भगेंद्र'ची लागण झाल्यासारखी स्थिती आहे.