मुंबई : गोरेगाव
परिसरात इमारतीच्या गच्चीवरून पडल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार आदर्श मित्रा
(49) यांचा रविवारी (ता. 6) सकाळी मृत्यू झाला. ते चालण्याचा व्यायाम
करण्यासाठी गच्चीवर गेले होते.
सिद्धार्थनगर येथील त्रिमूर्ती सोसायटीच्या सातव्या मजल्यावर आदर्श
मिश्रा राहत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते मॉर्निग वॉकसाठी
इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्यावेळी गच्चीवरून पडल्यामुळे त्यांचा
मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास
घडली. त्यांनी आत्महत्या केली असावी का, या अनुषंगानेही पोलिस तपास करत
आहेत.
या घटनेनंतर मिश्रा यांना तातडीने सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते इमारतीवरून खाली कसे पडले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस त्रिमूर्ती सोसायटी आणि नजीकच्या इमारतींमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करत आहेत. मिश्रा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या विक्री व पणन विभागाचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
ट्रॅक पॅंट आणि टी शर्ट घातलेले व हातात रुमाल घेतलेले मिश्रा गच्चीच्या दिशेने जात असल्याचे सातव्या मजल्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसते. दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात ते गच्चीवरून खाली पडत असल्याचे दिसते. परंतु, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.