अर्णब गोस्वामींच्या विरोधात कोलकता पोलिसांची तक्रार

कोलकता- रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध कोलकता पोलिसांनी बदनामीची तक्रार केली आहे. अर्णब गोस्वीमी यांच्या रिपब्लिक टीव्हीने 2 फेब्रुवारी रोजी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात दावा केला होता की, कोलकताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार फरार होते, यामुळेच कोलकता पोलिसांनी अर्णब गोस्वीमींच्या विरोधात बदनामी केल्याची तक्रार दाखल केली आहे.

कोलकाता पोलिसांनी गुरुवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना पत्र पाठवून चॅनेलवर आणि त्यांच्या विरूद्ध बदनामीचा खटला दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, कोलकता पोलिसांनी सांगितले आहे की पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे कोलकता पोलिसांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, राजीव कुमार हे 2 फेब्रुवारीला तर शहरात उपस्थित होतेच परंतु, 31 जानेवारी रोजी ते रजेवर असूनही पोलिस कार्यालयात हजर होते.
कोलकता पोलिसांनी लिहलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आम्ही या गोष्टीची गंभीर दखल घेत असून, पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्यासोतच अर्णब गोस्वामी यांनी कोलकता पोलिसांचीही बदनामी केली आहे. या पत्रात कोलकता पोलिसांनी गोस्वामी यांच्याकडे उत्तर मागितले असून, त्यांच्याविरुद्ध का कारवाई करू नये याचे स्पष्टीकरण द्यावे असे सांगितले आहे.