मुंबई- अधिस्वीकृती
पत्रकार बरोबरच जास्तीत जास्त पत्रकार यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी
या अधिवेशनात भरीव तरतूद करणार असे मत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना.
सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र
राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने मंत्रालयात ना. सुधीर मुनगंटीवार यांचा
सत्कार पेन्शन योजना पत्रकार यांचेसाठी लागू केले बद्दल आयोजित केला होता
त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्य संघटक संजय
भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मंत्रालय वार्ताहर संघटना सदस्य
खंडूराज गायकवाड, वृत्तवाहिनी प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, संस्कृती विभाग
प्रमुख संदीप भाटेवर, वृत्तवाहिनी संघाचे मुंबई अध्यक्ष संदीप माळवदे,
विभागीय अध्यक्ष स्वामी शिरकुल, वृत्तवाहिनी संपर्क प्रमुख उमेश कुलकर्णी,
ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब
वाकचौरे, अकोले तालुकाध्यक्ष अशोक उगले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे,
सरचिटणीस नरेश पाटील आदी उपस्थित होते.
पत्रकार हा
लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो मानाने जगला पाहिजे. त्यासाठी त्यांना पेन्शन
योजना लागू केली असून दहा कोटींची रुपयेची मागणी या पत्रकार संघाने केलेली
असताना पंधरा कोटी मंजूर केले आहे. मात्र ही तरतूद पुरेशी नसून खरे गरजवंत
पत्रकार उपेक्षित आहे. त्यांना शहरी ग्रामीण भेद न करता सर्वांना कशी लागू
करता येईल. यादृष्टीने पत्रकार संघाने मागणी केलेले दोनशे कोटी रुपयेचा
आराखडा तयार करून या अर्थसंकल्पात मंजूर करता येईल असे ना. मुनगंटीवार
यांनी सांगितले.तसेच सर्व पत्रकार यांचा समावेश महात्मा फुले जनारोग्य
योजनेत समावेश करण्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले
आहे.
समाजातील प्रश्न निरपेक्ष भावनेने पत्रकार
मांडत त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारने घेतली असून पत्रकार हल्ला
विधेयक, पेन्शन योजना, आरोग्य योजना असे निर्णय घेतले त्यात महत्वपूर्ण
भूमिका राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बजावली आहे. असे
मत राज्याचे संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले
सरचिटणीस
विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाचे अधिवेशनात मुख्यमंत्री व आपला गौरव
व्हावा यासाठी जळगाव येथे अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले त्यास
ही त्यांनी येण्याचे मान्य केले.
पत्रकार संघाचे वतीने यावेळी पगडी, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटून ना. मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले.