मुंबई - भारताचा ढाण्या वाघ, वायुसेनानी, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे काल मातृभूमीत परतले.
अभिनंदन यांना अटारी-वाघा सीमेवरून अमृतसरला नेण्यात आले. तेथून त्यांना विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात आले.
अभिनंदन वर्धमान हे आपल्या पत्नी तन्वीला
सहवैमानिक म्हणून बरोबर घेऊन गेले होते ही अचाट माहिती न छापल्याबद्दल
महाराष्ट्र टाइम्सचे अभिनंदन.
पाकिस्तानात अडीच दिवस कैदेत असताना परिस्थितीला धैर्याने तोंड देणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांना फोटोखालची ओळ वाचून मात्र झीट येईल.
अज्ञानाचा कडेलोट झाला की माणूस पत्रकार होतो हे शिरीष कणेकरांचं वाक्य म.टा.ने सिद्ध करायचं मनावर घेतलेलं आहे याचा आणखी एक पुरावा.
म.टा.ने पाकिस्तानी अधिकारी फरेहा बुग्ती यांना अभिनंदन वर्धमान यांची पत्नी म्हणून ठोकून दिलेलं आहे.