बिथरलेली 'होली काऊ'

मीडिया म्हणजे टीव्हीवरचे चार अँकर किंवा अंकात छापून येणारे चार पत्रकार नसतात.. ही पण एक इंडस्ट्री आहे ज्यावर अनेकजण अवलंबून आहेत.. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ काळानुसार व्याप्तीने बदलला आहे आणि त्याच एक व्यावसायिक स्वरूप आहे, हे कधीतरी आपण लक्षात घ्यायला हवं.

बहुसंख्य जनतेसाठी ज्या माध्यमांनी आजवर जागल्याची भूमिका बजावलीय, सध्या मात्र त्यांचा अस्तित्वाचा संघर्ष सुरुय..  अशात माध्यमांना जगविण्यासाठी समाज काय भूमिका घेईल? की दहा रुपये उत्पादन किंमतीचे वर्तमानपत्र घरी एक रुपयात आले म्हणून समाधान मानेल? आणि यावर अवलंबून असलेल्या पडद्या मागच्या त्या यंत्रणेच्या survival च काय? त्यांचा विचार कोणी करावा?

गेल्या दोन आठवड्यांत भारत-पाकिस्तान संबंधातील तणावाच्या निमित्ताने भारतीय माध्यमांवर टीकेची झोड उठली. व्यापक समूहापर्यंत पोचणाऱ्या टीव्ही, वृत्तपत्र अशा पारंपरिक माध्यमांच्या 'कन्टेंट'वर या टीकेचा रोख होता. शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारी माध्यमे कशामुळे बिथरत आहेत...? प्रश्नाच्या मुळाशी पोचण्याचा हा प्रयत्न...

सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांचा लेख नक्की वाचा