बोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ
पावसाळ्यात
कश्या पावसाळी छत्र्या उगवतात तश्या निवडणूक आली की, बंद पडलेले
साप्ताहिक पुन्हा सुरू होत होते. सध्याच्या डिजिटल युगात युट्युब चॅनलचा
सुळसुळाट झाला असून बोगस पत्रकारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
कोणतीही
कायदेशीर मान्यता नसताना बिनदिक्कत हे युट्युब चॅनल सुरू करण्यात आले
आहेत. बरं सुरू करणाऱ्याकडे ऑफिस किंवा अँकर नाहीत. मोबाइलवर शूटिंग करून
मोबाईल अँपच्या माध्यमातून थोडी बहुत रचना करून युट्युबवर क्लिप अपलोड
केली जाते. आणि वरून सांगितले जाते, हे राज्यस्तरीय चॅनल आहे.
यांच्याकडे
कुठलेही पत्रकारितेची डिग्री नाही, ज्यांची नेमणूक केली त्यांचे शिक्षण
दहावी सुद्धा नाही.दहावी नापास असणारे भामटे पत्रकार सुद्धा यात घुसले
आहेत. विशेष म्हणजे कायदेशीर मान्यता नसताना ओळखपत्र तयार करून अनेकांना
वितरित केले जाते आणि अज्ञानी नवख्या तरुणांकडून पैसे उकळले जात आहेत.
हातात
युट्युब चॅनलचा बांबू धरून हे पुढे पुढे करत असतात. कोणतीही पत्रकार
परिषद असो,किंवा सभा - संमेलन ! हे पहिल्या रांगेत बसलेले असतात. त्यामुळे
खऱ्या पत्रकारांचा कोंडमारा होत आहे.
विशेष
म्हणजे या युट्युब चॅनलवाल्यांचे 500 सुद्धा सबक्राईब नाहीत. त्यांची
क्लिप 100 लोक सुध्दा पाहत नाहीत. शिकार शोधण्यासाठी ते दिवसभर फिरत असतात.
100 रुपये दिले तरी हे खुश असतात. गाव पुढारी 100 ते 500 रुपये देऊन या
युट्यूब पत्रकारांचे लाड पुरवत आहेत. त्यामुळे गावोगावी भावी आमदार, भावी
खासदार यांची संख्या वाढली आहे.
सरकारने
युट्युब चॅनलबद्दल नियमावली तयार करावी, अश्या पत्रकारांना पत्रकार
परिषदेला बोलवू नये आणि कोणी ब्लॅकमेल करत असेल तर कडक कारवाई करावी, अशी
मागणी होत आहे.
कूञ्याच्या छञीसारखे
युट्यूब चँनेल येऊ लागले.
कुणीही आयबू गयबू उठून
हातात बुम घेऊ लागले.
भावी आमदार खासदारांचा आकडा
यांनीच तर वाढवला आहे.
शे दोनशेने मजुरीचा प्रश्न
यु ट्युब चँनेलने सोडवला आहे.
टिव्हीवर न दिसताच
दिसण्याचा बिनदिक्कत आव आहे.
खरे चँनेलवाले पाठीमागच्या रांगेत
यु ट्यूबवाल्याची डराँव डराँव आहे.
मोठमोठ्या लोकासोबात फोटो काढून
सोशल मिडियावर टाकायचे
त्याच फोटोचा आधार घेऊन
ब्लँकमेल करत टोकायचे.
शिळ्या बातमीस ब्रेकिंग न्युज
व्याकरणाने अर्थाचा अनर्थ केला आहे.
वरून सांगत फिरायचे
मी मोठ्या पञकाराचा चेला आहे.
खरे पञकार आडगळीत पडले
युट्युबच्या फेकाड्यांचा बोलबाला आहे.
अधिकारी, सामान्य घाबरून केले
यु ट्युबवाले काय बला आहे.