सध्या डिजिटल मीडियाचे
युग आहे . येणाऱ्या काळात मीडियात फार मोठे बदल होणार आहेत. भविष्यात अनेक
वृत्तपत्रे बंद पडतील आणि त्याची जागा ईपेपर घेतील आणि
ईपेपर वाचण्यासाठी वाचकांना पैसे मोजावे लागतील.
तसेच अनेक न्यूज चॅनल बंद पडून त्याची जागा अँप घेतील.
हेच भाकीत
मी सन २०११ मध्ये सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन
विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात केले होते. ( त्या बातमीची लिंक - http://www.dhepe.in/2011/03/ )
त्यानंतर ७ जानेवारी २०१९
रोजी नांदेडच्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात हाच
पुर्नउच्चार केला होता. ( त्या बातमीची लिंक - http://www.dhepe.in ) .
माझे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.
हिंदी दैनिक भास्कर आणि जागरण ने आता
ईपेपर वाचण्यासाठी शुल्क आकारणे सुरु केले आहे. वार्षिक वर्गणी ५०० आणि
मासिक वर्गणी ५० रुपये असा दर ठेवला आहे. तेही एका आवृत्तीसाठी. हळू हळू
सर्व दैनिके शुल्क आकारायला सुरुवात करतील. मराठी वृत्तपत्रेही ईपेपर
वाचण्यासाठी शुल्क आकारतील...
प्रिंट पेपर राहतील; पण किंमत १० रुपयाच्या पुढे होईल. किंमत वाढली तरच वितरक मिळतील. कारण अाता वितरकांना चार ते पाच रुपयांवर फार कमीशन मिळत नाही. सध्या मराठीत साप्ताहिक चित्रलेखा, साप्ताहिक सकाळची ई अावृत्ती वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास वितरण विभागावर पहिला आघात होणार आहे. वितरण विभागात मोठी कॉस्ट कटिंग होईल.

आज प्रत्येक वाचकांच्या हातात स्मार्ट फोन आहे. सध्याची इंटरनेट स्पीड 4 G आहे. भविष्यात 5
G होईल. त्यामुळे कोणतेही ईपेपर किंवा व्हिडीओ न्यूज वेगवानरित्या पाहता येणार आहे. त्यामुळे अनेक वृत्तपत्र बंद पडून त्याची जागा
ईपेपर
घेतील तसेच अनेक न्यूज चॅनल बंद पडून त्याची जागा अँप घेतील... तेव्हा पत्रकारांनो काळाबरोबर चला. अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करा.
सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
Mo- 9420477111