#Metoo बातमीमुळे स्पंदन महाराष्ट्र्र चॅनलमध्ये खळबळ

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये नव्याने सुरु होणाऱ्या स्पंदन महाराष्ट्र्र चॅनलमधील  #Metoo चा प्रकार बेरक्याने उघडकीस आणल्यानंतर मराठी माध्यमात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित चॅनलमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. आता चॅनल प्रशासन या 'आगाव' माणसावर काय कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

स्पंदन  महाराष्ट्र्र चॅनलमधील आऊटपूट हेड पूर्वी बेलापूर चॅनलमध्ये होता. येथे एका मुलीची छेड काढली म्हणून त्याची हकालपट्टी झाली होती. औरंगाबादमध्ये येताच त्याने हाच उद्योग सुरु केला. एका नवख्या मुलीला लगट करण्याचा प्रयत्न केला. मी  आऊटपूट हेड असून कोणाचे भले करायचे आणि कोणाचे वाईट करायचे हे माझ्या हातात असल्याचे तो सांगत होता. तसेच तो सदर मुलीला रात्री बेरात्री फोन करत होता. परवा त्याने रात्री डिनरसाठी हॉटेलमध्ये निमंत्रण दिले, त्यामुळे सदर मुलगी या सर्व प्रकाराला कंटाळली आणि राजीनामा देवून घरी गेली.

या प्रकाराने चॅनलमधील इतर मुली आणि महिला संतप्त झाल्या आहेत. स्पंदन महाराष्ट्र्र चॅनलमधील  #Metooचा प्रकार बेरक्याने उघडकीस आणल्यानंतर मराठी माध्यमात मोठी खळबळ उडाली आहे.
 महिला आयोगाने अशा घटनांची SUMoto  दखल घेणं गरजेचं आहे.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.


ता.क.
#Metoo सारखा प्रकार  आपल्या चॅनल अथवा वृत्तपत्रात  घडत असल्यास बेरक्याला मेल करा.. 
 
berkya2011@gmail.com

आपले नाव गुप्त ठेवले जाईल