मुंबई
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी , लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही
उमेदवार उभा न करता महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभा घेवून मोदी आणि शाह
यांच्यावर निशाणा साधला आहे. सभेच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवर मोदी -
शाह यांच्याविषयी लेखा - जोखा मांडत आहेत. त्यांच्या भाषणातील 'लाव रे तो
व्हिडीओ' हा डायलॉग फेमस झाला आहे.
काही
प्रचार सभा उरकल्यानंतर राज ठाकरे यांनी विविध न्यूज चॅनल्सला मुलाखती
दिल्या आहेत. टीव्ही ९ मराठी साठी न्यूज एडिटर आणि अँकर निखिला म्हात्रे
यांनी राज यांची मुलाखत घेतली आहे. मुलाखती दरम्यान राज आणि निखिला
यांच्यात चांगलेच खटके उडाले आहेत. इतकेच नाही तर राज यांनी निखिला यांना चांगलेच धारेवर
धरले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
निखिला म्हात्रे यांचा
लाव रे तो व्हिडीओ