मुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या
मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण
मॅनेजमेंट बदल्यामुळे त्यांचे घोडे आडले आहे तर नव्या
मॅनेजमेंटकडून तुळशीदास भोईटेने ऑफर लेटर घेतले आहे. त्यामुळे सतत चॅनल
आणि पेपर बदलणारे तुळशीदास भोईटे लवकरच टीव्ही ९ मराठी मध्ये दिसल्यास
आश्चर्य वाटू नये.
प्रकाश रेड्डीने टीव्ही ९
चॅनल अन्य एका ग्रुपला विकले आहे. त्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे.
प्रकाश रेड्डी ग्रुपने उमेश कुमावत यांना ऑफर लेटर दिले होते, त्यामुळे ते
न्यूज १८ लोकमत सोडून पुन्हा टीव्ही ९ मराठी जॉईन करणार होते, मात्र
मॅनेजमेंट बदलताच सध्या एबीपी माझामध्ये असलेल्या
तुळशीदास भोईटे यांनी संधान साधून ऑफर लेटर घेतले आहे.