सावरकर प्रकरणी एबीपी माझाचे अखेर लोटांगण !

मागितली माफी ! माझा विशेषही बंद !

मुंबई - सावरकर प्रकरणी  एबीपी माझाने  अखेर लोटांगण घातले आहे. या प्रकरणी जाहीर माफी मागत माझा विशेष हा वादग्रस्त कार्यक्रमही बंद केला आहे. उघडा डोळे बघा  नीट  महणणाऱ्या एबीपी माझाला हा  मोठा झटका मानला जात आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक वि. दा. सावरकर यांची 28 मे रोजी जयंती असते. एक महिन्यापूर्वी सावरकरांच्या जयंती दिवशी "उघड़ा डोळे, बघा नीट" म्हणणाऱ्या "एबीपी माझा"ने "माझा विशेष" या चर्चात्मक कार्यक्रमात "सावरकर नायक की खलनायक" यावर चर्चा घडवली.  एका थोर  क्रांतीकारकाबद्दल खलनायक हे अवमानकारक शब्द वापल्यामुळे सावरकर प्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या कार्यक्रमानंतर  एबीपी माझाला अनेक नेटिझन्सने सोशल मीडियावर ट्रोल केले.  इतकेच काय तर संपादक राजीव खांडेकर आणि न्यूज एंकर प्रसन्न जोशी यांना अनेकांनी फोन वरून  जाब विचारून तंग  केले होते. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वर्धापन दिन कार्यक्रमात सावकरकरांना खलनायक म्हणणारे तुम्ही कोण ? असा सवाल केला होता, तसेच सावरकर प्रेमी जनतेने त्यांच्या जाहिरातदारांना एबीपी माझाला जाहिराती देणे बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर काही जाहिरातदारानी जाहिराती बंद केल्या होत्या.
या सर्व प्रकारानंतर एबीपी माझाने परवा ऑन एयर माफी मागितली आणि वेबसाईट आणि युट्युब वरून याचे व्हिडीओ डिलीट केले.इतकेच नव्हे तर "माझा विशेष  आणि हस्तक्षेप"  हे दोन्ही चर्चात्मक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून बंद केले आहेत.एबीपी माझाला हा मोठा झटका मानला जात आहे.