मुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी
आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक
केली आहे. सारंग पाथरकर असे या आरोपीचे नाव असून या खून प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आनंद नारायण यांचा खून हॉटेल व्यवसायातून झाला की प्रेम प्रकरणातून झाला ?
याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. आरोपी सारंग पाथरकर याचे पुणे आणि
मुंबईत हॉटेल असून, या हॉटेल मध्ये न्यूज १८ लोकमतच्या एका माजी संपादकाची
पार्टनरशिप आहे. त्यामुळे या संपादकाची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच
आरोपी सारंग पाथरकर याची पुण्यातील काही पत्रकाराबरोबर उठबस होती, त्यामुळे
अनेकांची झोप उडाली आहे.