मुंबई
- टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा
दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल यांनी
हंगामी मुख्य संपादक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुळशीचे
मुख्य संपादक होण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
जिथे
तुळशी तेथे गटबाजी हे सूत्र कायम आहे. त्यामुळे सहा महिने ते एक वर्ष असा
तुळशीचा सतत प्रवास सुरु आहे. प्रत्येक चॅनलमध्ये किमान दोन वेळा रिंगण
पूर्ण करणारा तुळशी काही दिवसांपूवी टीव्ही ९ मराठी मध्ये दाखल झाला.
त्यात
मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांची विकेट पडली. त्यामुळे या पदावर आरूढ
होण्यासाठी तुळशी आतुर झाला, पण व्यवस्थापकांनी नवीन चांगला मुख्य संपादक
मिळेपर्यंत
टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल यांच्याकडे हंगामी
मुख्य संपादक म्हणून सूत्रे दिली आहेत.
एका ठिकाणी स्थिर न राहणाऱ्या तुळशीकडे सर्व सूत्रे सोपवण्यास मॅनेजमेंट तयार नाही. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छूक असून यासाठी ते नागपूरच्या गडावर चकरा मारत आहेत. टीव्ही ९ ची नवीन कंपनी आणि नागपूरचा गड यांचे बिझनेस कनेक्शन असून निरगुडकर यांना पुन्हा एकदा नागपुरी गड पावणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

व्हायरल बातम्या ! रियॅलिटी चेक ...
> जय महाराष्ट्र ( मराठी ) चॅनल हिंदीच्या इंडिया न्यूज ग्रुपने तर बंद पडलेले मी मराठी चॅनल गडकरीने विकत घेतले अश्या बातम्या सध्या वेगाने पसरत आहेत.
या बातम्यांची
रियॅलिटी चेक केली असता आमच्या पडताळणीत दिसून आले की,
> जय महाराष्ट्र चॅनल
इंडिया न्यूज ग्रुपने विकत मागितले होते ही वस्तुस्थिती आहे, पण मालक सुधाकर शेट्टी यांनी विकण्यास नकार दिला.
> बंद पडलेले मी मराठी चॅनल नितीन गडकरी यांनी विकत घेतले ही निव्वळ अफवा आहे.
जाता -जाता
टीव्ही ९ मराठी मधून अनेक जणांना नारळ देण्यात येत आहे. पॉलिटिकल रिपोर्टर विलास आठवले यांना परवा नारळ देण्यात आला.