अहमदनगर
: जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुसरीकडे वेतन मिळत नसल्याने आवृत्ती प्रमुख
मिलिंद बेंडाळे यांनी, आदर्श गावकरीला रामराम करून पुढारी जॉईन केले आहे.
डॉ. अनिल फळे यांच्यामुळे नावारूपास आलेल्या औरंगाबादच्या आदर्श गावकरीला आता घरघर लागली आहे. फळे यांच्यानंतर दिनेश हारे यांनी
आदर्श गावकरीचे नेतृत्व केले पण कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत नसल्याने त्यांनीही आदर्श गावकरी सोडून देशोन्नती जॉईन केले आहे.
हारे गेल्यानंतर व्यवस्थापक असलेल्या राडकर यांनी स्वतःकडेच कार्यकारी
संपादकपद घेतले. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद आणि जालनामध्ये घडी
नीट
बसवण्याऐवजी त्यांनी नगर आवृत्ती सुरु केली.येथे आवृत्तीप्रमुख म्हणून सकाळच्या
मिलिंद बेंडाळे यांना घेण्यात आले होते. त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून सर्व तयारी करून नगर आवृत्ती सुरुही केली. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यात दोन महिन्याचा पगार न मिळाल्याने
मिलिंद बेंडाळे यांनी, आदर्श गावकरीचा राजीनामा देवून पुढारी जॉईन केले आहे.
नगरमध्ये
आदर्श
गावकरी सुरु होण्याअगोदरच व्यवस्थापक आणि कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकर यांनी नगरच्या एका बारमध्ये धिंगाणा घातला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बेरक्याच्या
हाती लागला आहे. हा व्हिडिओ मालक अंबादास मानकापे - पाटील यांच्यापर्यंत
पोहचला आहे. राडकर हे मानकापे यांचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे
राडकरवर काय कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
ढोलेंच्या डोक्यावर
बेंडाळे !
नगरमध्ये पुढारीमध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत.ब्युरो चीफ कैलास ढोले यांच्या डोक्यावर आता निवासी
संपादक म्हणून मिलिंद बेंडाळे यांना आणून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे नगरमध्ये येऊ पाहणाऱ्या पुरुषोत्तम सांगळे ( पुढारी,
सोलापूर )
यांची
पुन्हा एकदा बोळवण करण्यात आली आहे.