मुंबई
- ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘साम टीव्ही न्यूज’ चॅनेल हे मराठीतील सर्व मराठी
न्यूज चॅनेल्समध्ये पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले आहे. बार्क (BARC) या
संस्थेच्या ३ व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार ‘साम टीव्ही न्यूज’ने मराठीतील
सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकले आहे. या आठवड्यात २३.३ टक्के
प्रेक्षकांची पसंती ‘साम टीव्ही न्यूज’ला मिळाली आहे. विशेष म्हणजे, सर्व
मराठी न्यूज चॅनेल्समधील टॉप १०० बातमीपत्रांमध्ये ‘साम टीव्ही न्यूज’चे
तब्बल ५७ कार्यक्रम झळकले आहेत. हा न्यूज चॅनेल्सच्या इतिहासातील नवा
विक्रम ठरला आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये ‘साम टीव्ही न्यूज’
लोकप्रिय असल्याचे ‘बार्क’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
‘साम टीव्ही न्यूज’ने कायमच राजकीय, निष्पक्षपाती आणि लोकाभिमुख बातम्यांना प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच ‘साम टीव्ही न्यूज’चा टाइम स्पेंडही इतर सर्व न्यूज चॅनेल्सच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ‘व्हायरल सत्य’, ‘टॉप ५०’, ‘स्पॉटलाइट’, ‘मेगा प्राइम टाइम’, ‘आज दिनांक’, ‘सरकारनामा ३६०’, ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’, ‘आज काय विशेष’, ‘३६ जिल्हे ३६ रिपोर्टर’ यासारख्या बातमीपत्रांना प्रेक्षकांची सातत्याने पसंती मिळाली आहे. बातम्यांमधील वेगळेपणा आणि सत्याची बाजू मांडत सकारात्मकतेला दिलेले प्राधान्य, यामुळे ‘साम टीव्ही न्यूज’ चॅनेलने अल्पावधीत लोकप्रियतेची नवनवी शिखरे सर केली आहेत. ‘बार्क’च्या ३०व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार ‘एबीपी माझा’, ‘झी २४ तास’, ‘नेटवर्क १८ लोकमत’, ‘टीव्ही ९’ यांसारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकण्याची किमया ‘साम टीव्ही न्यूज’ने पुन्हा एकदा साधली आहे. ‘साम’च्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे.