मुंबई - बेरक्याचे वृत्त पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे. न्यूज १८ लोकमतमधून बाहेर पडलेल्या उमेश कुमावत यांनी टीव्ही ९ मराठी मध्ये एंट्री केली आहे. त्यांच्याकडे संपादक पदाची सूत्रे देण्यात आल्यामुळे तुळशीपत्राच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.
कुमावत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच टीव्ही ९ मराठी मध्ये मुलाखत दिली होती. पण टीव्ही ९ मराठीची मालकी अन्य ग्रुपकडे गेल्याने कुमावतचे घोडे आडले होते. दरम्यान
तुळशीपत्र
उघडा डोळे बघा नीट सोडून टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन झाला होता. तो संपादक पदाची स्वप्ने पाहत असतानाच उमेश कुमावत संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. त्यामुळे तुळशीपत्राची प्रचंड गोची झाली आहे. ज्युनिअर कुमावतच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याने त्याची पुन्हा एकदा चुळबुळ वाढली आहे. त्यामुळेच त्याने न्यूज १८ लोकमतमध्ये डाळ शिजते का ? याची चाचपणी केली.
दरम्यान, न्यूज १८ लोकमतमध्ये एंट्री करण्यासाठी विग कमांडर, तुळशीपत्र, दरवळणारा फणस असे जुने नवे तब्बल ८ ते १० जण चकरा मारत आहेत. तसेच राहा एक पाऊल पुढे मध्येही अनेकजण खेटे मारत आहेत. न्यूज १८ लोकमत आणि राहा एक पाऊल पुढे मध्ये कोणाचा नंबर लागणार हे लवकरच कळेल.