मुंबई - न्यूज १८ लोकमत चॅनलच्या संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार
महेश म्हात्रे यांची निवड झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे सोमवारी घेतली आहेत. म्हात्रे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
उमेश कुमावत यांनी राजीनामा दिल्यानंतर न्यूज १८ लोकमतच्या संपादकपदी कोणाची निवड होणार ? याकडे लक्ष वेधले होते. या पदासाठी मंदार फणसे, तुळशीदास भोईटे आदी इच्छूक होते. मात्र न्यूज १८ इंडिया ( हिंदी) चे राजकीय संपादक असलेल्या महेश म्हात्रे यांच्याकडेच
न्यूज १८ लोकमत चॅनलच्या संपादकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
महेश म्हात्रे यांचा पत्रकारितेचा प्रवास लोकप्रभा या साप्ताहिकापासून सुरु झाला होता. सर्वात कमी वयात ते नागपूर सकाळचे संपादक झाले होते. इंडियन एक्स्प्रेस, प्रहार आदी वृत्तपत्रातही त्यांनी काम केले आहे. दूरदर्शनमध्ये त्यांनी काम केले आहे.
न्यूज १८ लोकमत चॅनलमध्ये त्यांची ही दुसरी इनिंग आहे. मंदार फणसे ( दुसरी टर्म ) संपादक असताना म्हात्रे कार्यकारी संपादक होते. आता त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार आला आहे.
प्रसाद काथे जय महाराष्ट्रमध्ये
झी २४ तास मधून बाहेर पडलेले
प्रसाद काथे आज किंवा उद्या जय महाराष्ट्र मध्ये संपादक म्हणून जॉईन होत आहेत. जय महाराष्ट्रचे राजकीय संपादक आशिष जाधव झी २४ तास मध्ये कार्यकारी संपादक होताच काथे जय महाराष्ट्रमध्ये गेले आहेत.
महेश म्हात्रे आणि
प्रसाद काथे यांच्या नव्या इनिंगला बेरक्याच्या शुभेच्छा !