लोकसत्तामधील 'बेरक्या' चे अभिनंदन !

मुंबई - आजच्या मुंबई लोकसत्ता मध्ये पान दोनवर " मुख्यमंत्री कार्यालयासाठी दोन पत्रकारांची धड़पड़" ही बातमी प्रसिद्ध झाली आहे, या बातमीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माध्यम सल्लागार होण्यासाठी दोन पत्रकारांची लॉबिंग सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस सरकारमध्ये रविकिरण देशमुख आणि केतन पाठक हे माध्यम सल्लागार होते. फडणवीस जाताच त्यानाही पायउतार व्हावे लागले ! पण  केतन पाठक ठाकरे सरकारमध्ये नसले तरी आता फडणवीस विरोधी पक्षनेते झाल्यामुळे त्यांचे
जनसंपर्क अधिकारी होवू शकतात !

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येताच, केतन वैद्य आणि संजय जोग यांनी लॉबिंग सुरु केली आहे. केतन वैद्य  हे "मातोश्री" जवळचे  तर संजय जोग हे  "सिल्व्हर ओक" जवळचे  मानले जातात !  आता या   दोघांची वर्णी लागणार की राजकारणी लोकांत राहून राजकारण करणार हे लवकरच कळेल !

असो, लोकसत्ताने  "बेरकी"पणा सुरु केल्याबद्दल  आम्हाला उलट  आनंद आहे. लोकसत्ता मध्ये आमचा एक  "बेरक्या"  आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे !