सोलापुरी ओबामाचा ढोंगी चेहरा उघड !

सोलापुरी ओबामा यांचे भोपाळ शेठच्या  पेपर मध्ये  जसे आगमन झाले आहे, तसे गटा - तटाचे राजकारण पुन्हा  सुरु झाले आहे. ओबामाने आपल्या मर्जीतील माणसे गोळा करण्यास सुरुवात केली असून काही   XX बरोबर 'बुवा'  ला खास पाचारण  केले आहे. एकीकडे अमरावती, अकोला आदी  विदर्भातील आवृत्या शेवटच्या घटका मोजत असताना, सोलापुरी ओबामाने पुण्यात आवृत्ती सुरु करून आपली सोय लावण्याचा आतबट्टयाचा सल्ला भोपाळ शेठला दिला आहे.   शेठला  'दिव्य'  दृष्टी आली तरच महाराष्ट्रात भविष्य उज्वल आहे अन्यथा आहे त्या ठिकाणाहून गाशा गुंडाळावा लागेल.

सोलापूर, अकोला, पुणे , मुंबई  आदी ठिकाणी  ' दिव्य ' प्रताप केल्यामुळे  बदनाम झालेल्या  सोलापुरी ओबामाने  पून्हा एकदा 'गालगुच्चे' आणि पाठीवरून हात फिरवणे सुरुच  ठेवले  आहे. याच  विकृतीमुळे सात - आठ वर्षापासून काम करणाऱ्या दोघींनी राजीनामा देवून घरी बसने पसंद केले. त्यात चार ओळीची बातमी लिहिता न येणाऱ्या एका कोल्हापुरीमुळे काहीजण अस्वस्थ झाले होते. मात्र असंतोष वाढतच  ओबामाने तिला परत पाठवले.

एकीकडे शोषण आणि दुसरीकडे सक्ष्मीकरणाचे ढोंग सुरु आहे.सोलापुरी ओबामाने परवा एक इव्हेन्ट  राबवला. मात्र  लाखो रुपये खर्च करून राबवण्यात  आलेल्या इव्हेन्टचा  फियास्को झाला, तरीही लाखोंची गर्दी अशी खोटी माहिती आणि खोट्या  बातम्या देवून भोपाळ शेठला मुर्खात काढले.

सोलापुरी ओबामा हेड ऑफिस मध्ये आठवड्यातील एक किंवा दोन दिवस असतात, बाकी दिवशी भाषण ठोकत गावोगावी फिरत असतात.केवळ चमकोगिरी करून मालकाच्या डोळ्यात धूळफेक करणारे सोलापुरी ओबामा दर दोन वर्षाला  दैनिक बदलतात आणि नेत्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल लिहीत असतात. काही महिन्यापूर्वी एका मंत्र्यावर बदनामीकरक मजकूर लिहिल्यामुळे ओबामा अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांच्यावर काही बंधने लावण्यात आली आहेत.

त्यांनी  ओबामा यांच्यावर जे पुस्तक लिहिले आहे, ते एका इंग्रजी  पुस्तकातील कॉपी करून लिहिले आहे. त्यामुळे त्या  इंग्रजी  पुस्तकाचे ज्यांच्याकडे कॉपी राईटचे अधिकार होते त्या पुस्तक प्रकाशन संस्थेने सोलापुरी ओबामावर पुण्यात कॉपी राईटची केस ठोकली आहे. हे स्वतःला लेखक समजतात पण मजकूर कॉपी राईटचा असतो, त्यांचे जे लेख असतात ते एक जण लिहून देत असतो आणि हे सर्व स्वतःच्या नावावर खपवत असतात. अश्या या ढोंगी, मुखवटा पांघरलेल्या सोलापुरी ओबामाचा खरा चेहरा जेव्हा भोपाळ शेठला  समजेल तेव्हा गच्छंती अटळ आहे.