मराठी न्यूज चॅनल्सचा टीआरपी घसरला !

मुंबई - मराठी वृत्तपत्राचा खप जसा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, तसेच मराठी न्यूज चॅनल्स  पाहणाऱ्या दर्शकांची संख्याही कमी होत चालली  आहे. त्यामुळेच मराठी न्यूज चॅनल्सचा टीआरपी घसरला आहे.

मराठी न्यूज चॅनल्स मध्ये गेले काही आठवडे कधी एबीपी माझा तर कधी टीव्ही ९ मराठी नंबर १ ठरत आहे. साम चॅनल नेहमी क्रमांक तीन वर राहत आहे. अधून - मधून कधी नंबर दोन तर कधी नंबर १ येत आहे. तर झी २४ तास क्रमांक चारवर तर न्यूज १८ लोकमत क्रमांक पाच कायम राहत आहे. जय महाराष्ट्र चॅनल्स नेहमी सहावर राहत आहे.

न्यूज १८ लोकमत सर्व केबल्स आणि डीटीएच वर दिसत असताना टीआरपी  कधी ७,  कधी ८ तर कधी ९ येत आहे.  त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्व काही चांगले असताना टीआरपी इतका कमी कसा ? हे सर्वाना पडलेले कोडे आहे.

जय महाराष्ट्र चॅनल्सची तर पार वाट लागली आहे. या चॅनलचा टीआरपी चक्क २ वर आला आहे. तीन ते चार महिन्याचे वेतन थकल्याने अनेक कर्मचारी निघून गेले आहेत, त्यात गचाळ वितरणामुळे चॅनलची वाट लागली आहे. कंटेंट नसल्याने जय महाराष्ट्र चॅनलला दर्शकानी जय महाराष्ट्र केले आहे.

या चॅनलमधील ७० टक्के कर्मचारी नव्याने सुरु झालेल्या लोकशाही चॅनल मध्ये गेले आहेत. यंग आणि वुमन पॉवर म्हणणाऱ्या लोकशाही चॅनलमध्ये सध्या तरी दम दिसत नाही. हे चॅनल्स प्रजासत्ताक दिनी सुरु झाले, त्याची युट्युबवर  लाइव स्ट्रीम दिसत होती, पण  दुसऱ्या दिवशी बंद झाली. हे चॅनल अजून तरी कुठल्याही डीटीएच वर दिसत नाही. मी मराठीचे विजय शेखर यांनी जुने सहकारी राहुल पहूरकर, सोनम ढेपे - मोरे यांना घेऊन चॅनल रन केले आहे.

औरंगाबादहुन एक वर्षांपूर्वी सुरु झालेले A.M. न्यूज चॅनल अजून तरी प्रभाव पाडू  शकले नाही. संपादक रघुनाथ पांडे यांनी राजीनामा देऊन पुन्हा पुण्यनगरी ( नागपूर )  जॉईन केले आहे. अनेक न्यूज अँकर, कर्मचारी सोडून गेले आहेत. रडतपडत चॅनल सुरु आहे.

दरम्यान, डीटीएचवर चॅनल प्रक्षेपण करण्यासाठी टाटा स्काय किमान दोन कोटी , इतर डीटीएच किमान १ ते दीड कोटी मागत आहेत. वितरणाचा खर्च एक वर्षाला डीटीएच आणि केबल्स नेटवर्क मिळून १२ ते १४ कोटी लागतो.  त्यामुळे डिजिटल प्लँटफॉर्म हाच उत्तम पर्याय शोधून सकाळ माध्यम समूहाने सुगरण हे  नवे चॅनल डिजिटल माध्यमातून लॉन्च केले आहे. सध्या हे चॅनल युट्युब आणि जियो अँपवर लाइव्ह दिसत आहे. लवकरच झी ५, मॅक्स प्लेयर वर येणार आहे. त्याचबरोबर स्वतःचे अँप लॉन्च करणार आहे.

घर का भेदी लंका ढाये !

जय महाराष्ट्र चॅनल इंडिया न्यूज चॅनल टेकओव्हर करणार असल्याचे सांगितले जात आहे, पण त्याची प्रक्रिया स्लो सुरु आहे. चार ते पाच महिन्याचे वेतन थकल्याने अनेक कर्मचारी निघून गेले आहेत. नवे कर्मचारी यायला तयार नाहीत. चॅनल्स मधीलच ज्यांच्यावर टांगती तलवार आहे,  ते नव्याने येणाऱ्या फ्रेशर्स आणि कर्मचाऱ्यांना 'येऊ नका, पगार होत नाही, काही खरे नाही' असे गुपचूप  सांगून त्यांना निगेटिव्ह करीत आहेत. घर का भेदी लंका ढाये ! अशीच अवस्था जय महाराष्ट्र चॅनल्सच्या सुधाकर शेट्टी यांची झाली आहे.

 जाता - जाता 
एक वर्षांपूर्वी ईटीव्ही या डिजिटल चॅनलचे रिलॉन्चिंग झाले, परंतु अजूनही मराठी दर्शक आणि वाचकांनी त्याला पसंती दिलेली नाही. इनपुट हेड असलेले मनोज जोशी यांनी काही  महिला रिपोर्टरबरोबर नको त्या विषयावर पर्सनल चॅटिंग केल्याने अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध 3 महिला रिपोर्टरनी थेट रामोजी रावकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची सध्या चौकशी सुरु असून, जोशी यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.