दिव्य मराठीकडे 3 कोटी रुपयांची थकबाकी, पत्रकारांचा पीएफ थकवला...


औरंगाबाद - जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणार्या पत्रकरांना हक्काच्या व्हेज बोर्डनुसार म्हणजे मजिठिया वेतन आयोगानुसार वेतन न दिल्याबद्दल दैनिक दिव्य मराठीला मा. कामगार न्यायालयाकडून चपराक बसल्यानंतर आता पीएफ कार्यालयानेही तब्बल  3 कोटी 7 लाख 34 हजार 168 रुपयांची थकबाकी असल्याचा अहवाल तयार केला आहे. माजी डेप्युटी न्यूज एडिटर सुधीर जगदाळे यांनी सन 2017 रोजी केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेल्या 7-A इन्कॉयरीदरम्यान  इन्फॉन्समेंट ऑफिसरच्या अहवालातून हे सत्य बाहेर आले आहे.

नियमानुसार पीएफ कपात होत नसल्याची तक्रार माजी डेप्युटी न्यूज एडिटर सुधीर जगदाळे यांनी औरंगाबात फीएफ कार्यालयाकडे केली होती. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे मा. पीएफ कमिशनर साहेबांनी 7-A इन्कॉयरी सुरू केली. इन्कॉयरीदरम्यान मजिठिया क्रांतीकारी सुरज जोशी व विजय वाखडे यांनीही हजेरी लावत शेवटपर्यंत या प्रकरणात लढा दिला. पत्रकार/गैरपत्राकारंच्या सॅलरी स्लीपवर बेसीक, एचआरए, कन्वेन्स अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, एज्युकेशन अलाउन्स, स्पेशल अलाउन्स आदी कंपोनंट आहेत.  कंपनीकडून फक्त बेसीकवरच 12 टक्के पीएफ कपात करण्यात येते. नियमानुसार स्पेशल अलाउन्सवरही 12 टक्के कपात करायला पाहिजे. या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने CIVIL APEAL NO(s). 6221 OF 2011 (THE REGIONAL PROVIDENT FUND COMMISIONER (II) WEST BENGAL VERSU VIVEKANANDA VIDYAMANDIR AND OTHERS) या प्रकरणाद्वारे दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी लॅंडमार्क जजमेंट दिले. स्पेशल अलाउन्स हा बेसिकचाच पार्ट असल्याचा ऐतिहासिक निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने देवूनही दिव्य मराठी स्पेशल अलाउन्सवर 12 टक्के पीएफ कपात केली नसल्याची बाब  7-A इन्कॉयरीदरम्यान  इन्फॉन्समेंट ऑफिसरच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे दिव्य मराठी या दैनिकाकडे  3 कोटी 7 लाख 34 हजार 168 रुपयांची थकबाकी काढण्यात आली आहे. 

सर्व पत्रकार/गैरपत्रकारांना मिळणार थकबाकी
3 कोटी 7 लाख 34 हजार 168 रुपये ही थकबाकीची रक्कम दिव्य मराठीतील सर्व पत्रकार/गैरपत्रारांची आहे. तक्रार जरी सुधीर जगदाळे यांनी केली असली तरी थकबाकीची रक्कम सर्व पत्रकार/गैरपत्रकारांची असल्याचे अहवालात नमूद आहे. जे कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत ते ही थकबाकीच्या रकमेस पात्र असतील.

तीन वर्षाच्या लढाईला अखेर न्याय
सन 2017 मध्ये केलेल्या तक्रारीवर सुरू झालेल्या 7-A इन्कॉयरीला आता मूर्तरूप येत आहे. सुमारे 3 वर्षांपासून हा लढा सुरू आहे. यापुढेही सुरू राहील. सुधीर जगदाळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर काही दिवसांनी सुरज जोशी, विजय वानखडे यानीही या प्रकरणात उडी घेतली. त्यानंतर अनेक पत्रकार/गैरपत्रकरांनी इमेलद्वारेही तक्रारी केल्या. मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर. लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया.