महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोन पत्रकारांना मदत

अहमदनगर - संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना औषध उपचारासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा संगमेनर यांच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथील दैनिक लोकमत चे उपसंपादक रियाज सय्यद यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबास  २५ हजार रुपयेचा मदतीचा धनादेश देण्यात आला.        
 
संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना औषध उपचारासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा संगमेनर यांच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ताभाऊ उणवने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राहाणे, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभोषडोके, पत्रकार दत्ता गाडगे, दत्ता जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर शाखेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, तालुका सचिव संजय गोपाळे, सदस्य राजू नरवडे, शेखर पानसरे, विकास वाव्हळ, बाबासाहेब कडू, संजय साबळे, भारत पडवळ, बाळासाहेब गडाख, अंकुश बुब आदी उपस्थित होते.
 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथील दैनिक लोकमत चे उपसंपादक रियाज सय्यद यांचे निधन झाले.मुळे त्यांच्या कुटुंबास  २५ हजार रुपयेचा मदतीचा धनादेश देण्यात आला.       
       महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतजी मुंडे व संघटक संजयजी भोकरे  यांच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी हा उदात्त हेतूने राज्यभर कार्यक्रम राबविला जातो. 
 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य  सरचिटणीस विश्वासराव आरोटे,यांच्या हस्ते सय्यद यांचे बंधू राज सय्यद यांच्या कडे धनादेश सुपूर्त केला. यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष अनिल राहणे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुकाध्यक्ष अशोक उगले आदी उपस्थित होते