खंडणी प्रकरणात पुण्यातील १४ पत्रकार अडकले !

पुणे - शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख रुपये उकळण्यात आल्याप्रकरणी दोन  जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात मध्यस्थी करणारा एक पोलीस मित्र सध्या रडारवर असून, त्याने शहरातील १४ पत्रकारांची नावे घेतल्याचे समोर येत आहे.

दरम्यान,  एका आरोपीने अटकपूर्व  जामीन मिळावा यासाठी न्यायालयात जो अर्ज दाखल केला आहे, त्यात या खंडणी प्रकरणात  कोण कोण वाटेकरी होते, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यात महाराष्ट्राचा मानबिंदू मधील चोरावर मोर होणाऱ्या एका पत्रकाराचे नाव असून, आणखी एका  वरिष्ठ पत्रकाराचे नाव आहे.

पोलीस मित्रने ज्या १४ पत्रकरांची नावे घेतली आहेत, त्यात शहरात पत्रकारितेच्या नावाखाली दलाली करणारे पत्रकार आहेत. या सर्वावर पोलीस गुन्हा दाखल करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे  त्याचा  तपास राज्याच्या  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

१४ पत्रकारांचा मास्टर माईंड सबका बंधू असून , याच प्रकरणामुळे पद्मश्रीच्या पेपरमधून एकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, मानबिंदू आपल्या  चोरावर मोर पत्रकारावर काय कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.