लोकमतचा दावा मटाने फेटाळला

मुंबई - मुंबईत आम्हीच नंबर १ असल्याचा  दावा  लोकमतने काही दिवसापूर्वी केला होता. तो दावा महाराष्ट्र टाइम्सने फेटाळून लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मानबिंदू आणि स्मार्ट मित्र मध्ये न्यूज पेपर वॉर सुरु झाला आहे.

लोकमतने २८ जानेवारी रोजी सर्व आवृत्तीत मध्ये शाई शपथ घेत आम्हीच नंबर १ असल्याचा दावा केला होता. त्यात मुंबईत महाराष्ट्र टाइम्स, पुण्यात सकाळ, कोल्हापुरात पुढारी, औरंगाबादेत  दिव्य मराठी, अकोल्यात देशोन्नती, सोलापुरात संचार आदी दैनिकांची वाचक संख्या कमी दाखवून आम्हीच नंबर १ असल्याचा दावा केला होता. लोकमतचा हा दावा किती भंपक आहे, हे प्रतिस्पर्धी दैनिकांनी सांगण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने एक जाहिरात प्रसिद्ध करून लोकमत पेक्षा दुप्पट वाचक संख्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मुंबईत नंबर १ नेमके कोण ? असा प्रश्न वाचकांना पडला आहे. 

लोकमतचा दावा
हेही वाचा

लोकमतने घेतला प्रतिस्पर्धी दैनिकाबरोबर पंगा

महाराष्ट्राचा मोतीबिंदू !