निकालानंतर शैलेश पंडित यांना होटवार कारागृहात पाठविण्यात आले. 22 जून 2015 रोजी, दूरदर्शनच्या स्टेशनरी स्टोअर विभागातील लिपिक अशोक कुमार याने आरोपीविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. 23 जून 2015 रोजी सीबीआयच्या पथकाने त्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 7 मार्च 2020 रोजी त्याला कोर्टाने दोषी ठरवले होते. सीबीआयने आरोपीविरोधात 16 साक्षीदार हजर केले होते.
दूरदर्शन केंद्रात वेगवेगळ्या तारखांना 1.04 लाख रुपये किंमतीची स्टेशनरी पुरविली गेली होती, या देयकाच्या बदल्यात आरोपी स्टेशनरी सेक्शनच्या लिपिकांकडून दहा टक्के कमिशन मागितले होते. फिर्यादी अशोक कुमार यांच्यानुसार 20 जून 2015 रोजी आरोपीने त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावले आणि कमिशन न दिल्यास निलंबित करण्याची धमकीही दिली. या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती.
सीबीआय कोर्टाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या अनुसार च्या 7 व्या कलमाअंतर्गत लाच मागितल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा व 10 हजार दंड तसेच 13/2 (पदाचा गैरवापर) चार वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड आकारात शैलेश पंडित यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
0 टिप्पण्या